तुला वजा केल्यावर बाकी काही इतर नाही तुझ्या शिवाय मी आयुष्य आयुष्यातच धरत नाही तू असणं किती छान आहे जस एक दुसऱ्यातच प्राण आहे नाही तर हे जग म्हणजे नुसतं माणसांच रान आहे तुझ्यावर रागावण हा तुला आठवण्याचा बहाणा आहे तू आलीस की तो जातो तसा माझा राग शहाणा आहे तुझी आठवण हा नित्य नवा अनुभव आहे कधी उसळणारा वादळ तर कधी पहिला दव आहे 😊
0 likes
0 shares