तास न तास तुझ्या घराच्याबाहेर तुझी वाट पाहणे सोपे नव्हते ग, तू भेटल्यावर तुझ्याशी बोलण्यासाठी धडपड करणे सोपे नव्हतेे ग....... मित्रांना खोटे बोलून चोरून तुला भेटायला येणे सोपे नव्हते तू प्रेम करशील का नाही हे माहीत नसताना तुझ्यावर प्रेम करणे सोपे नव्हते ग...... दिवसरात्र फक्त तुझ्याच विचारात राहणे सोपे नव्हते ग..... माझ्यासोबत बाहेर येण्यासाठी तुला विनवणे माझ्यासाठी सोपे नव्हते ग..... तुझ्या त्या एका मेसेसची रात्रभर वाट पाहणे सोपे नव्हते ग तुला माहीत नसताना तुझ्यावर प्रेम करणे सोपे नव्हते ग ........
0 likes
0 shares