Back to feed
S
Saanvi Deshmukh Love · Marathi · Romantic

थांबव ग राणी तुझ मिस कॉल देण, मोबाइलच बिल झालय आता ग जीव घेण, मिस कॉल देण्याची तुला हौस ग न्यारी, बिल मात्र पडतय माझ्या ग पदरी.... अलार्मच्या आधीही येतो तुझा मिस कॉल, माझ्याही आधी होते माझ्या मोबाइलची सकाळ, कॉल करायला राणी तुला कधी जमतच नाही, चुकून केलाच कधी तर ५ मिनिटापेक्षा जास्त तू बोलत नाही, मी कॉल केल्यावर मात्र तुला तासनतास बोलावास वाटत, तुझ बोलणं वाढलेल पाहून काळीज माझग फाटत तुझ हे मिस कॉल देण आता रोजचच झालय, माझाही तुला कॉल कारण मग साहजिकच झालय, पण .... मी ही आता ठरवलय तुला कॉल नाही करायच, आलाच तुझा मिसकॉल तर तुलाच परत मिसकॉल द्यायच, तुझा कॉल येईपर्यंत तुला मिस कॉल देत रहायच, आणि तू कॉल केल्यानंतर मुद्दामहुन जास्त वेळ बोलायच, तुलाही कळू दे आता कॉल करण्याच दु:ख, मला ही मिळू दे मग थोडस मिस कॉल देण्याच सुख …

0 likes 0 shares
WhatsApp