Back to feed
K
Kabir Chauhan Love · Marathi · Romantic

*दुःख कशाचे*???, 😌😅 लेकीच्या डोळ्यात सुंदर भविष्याचे स्वप्न तरळले की आईचे हृदय गलबलते, नवीन संसाराची चित्र रंगवायला लागली, कि आईच्या मनात कळ उठते.. हे दुःख नक्की कशाचे असते ? काहीतरी हरवल्याचे ? की तुटल्याचे ? आपला काळजाचा तुकडा कोणीतरी काढून नेतोय याचं ? का आपलीच मुलगी खुशीने परकी होते आहे याचं ? का आता आपला मालकी हक्क कमी होणार तिच्या वरचा याचं ? नक्की काय निसटतं हातातून ? खरं तर सगळंच ! हळुहळू आपल्याच जिवाचा तुकडा आपल्यापासून दुरावतो, परक्या घरात स्थिरावतो, इतका मिसळतो कि आपणच परके होतो.. दुःख आहेच की याचं ! आजपर्यंत आपण जिचं विश्व होतं ती आता आपली न राहता इतर कुणाची जास्त काळजी करते, महत्व देते , क्वचित आपल्याकडे दुर्लक्ष करते.. वाईट वाटणारंच की याचं ! अतिशय लाडकी लेक, जिची प्रत्येक इच्छा पुरवायचा प्रयत्न केलेला असतो तिची ही इच्छा जरा जडच जाते पुरवायला.कारण आत्तापर्यंत तिचं मन राखलं तर ती अजून जवळ यायची, आता ? आता ती दूर जाणार.. त्रास होणारच की याचा ! आपल्याला विचारून सगळं करणारी, आपला विचार करणारी, आपल्या मताचा आदर करणारी मुलगी जेव्हा त्याच्या मताने वागायला लागते, त्याला विचारायला लागते , प्रसंगी आपल्या मताकडे दुर्लक्ष करते, तेव्हा वाईट तर वाटणारच ! आपल्या घरात सांगूनही काहीच न करणारी, मस्तपैकी लोळत रहाणारी, हक्काने हट्ट पुरवून घेणारी , कायम स्वतःचंच खरं करणारी लेक एकदम परक्या घरात चाचपडत का होईना रुळायला लागते, त्यांचीच होऊन जाते, कदाचित लाडकी होते.. तेव्हा दुःख तर होणारच ! हातातून वाळू निसटते, काळ मुठीत नाही रहात, क्षण सहजपणे पकडता येत नाही... फुलपाखरू कधी चिमटीत पकडता येतं का ? नाही.. पण ते इतक्या सहजपणे निसटतं तेव्हा वाईट वाटतंच थोडंसं.. मग हा तर जिवाचा तुकडा ! इतक्या सहज परका करताना त्रास तर होणारच ! मुठीतला मोती हलकेच देऊन टाकताना वाईट तर वाटणारंच ! आपल्या मातीतलं रोप दुसरीकडे मुळं पकडताना जीव तर तुटणारच !!!!! 😔 , 👸👰💁🙆👯💃👩‍❤‍👩👭👭🙎

22 likes 5 shares
WhatsApp