दुखावशिल माझ्या शब्दाने मला ते सहन होणार नाही त्यावर एक उपाय सोपा मी काहीच बोलणार नाही . . . येईल माझ्या शब्दांना मुकेपण होईल तुजला त्याची सवय पण हळवे मन तुझे मी तोडणार नाही त्यावर उपाय सोपा मी काहीच बोलणार नाही . . . . बदलेल काळ होईल तुझ्या वेदनेचे शमन लाख शपथा घाल आता त्यांना मी बधणार नाही त्यावर एक उपाय सोपा मी काहीच बोलणार नाही. .
0 likes
0 shares