Back to feed
N
Nikhil Bhat Love · Marathi · Romantic

दातात ओठ का हे दाबून हासली तू मज सांग ना मला का पाहून लाजली तू सांगून आज गेला मज चंद्र पौर्णिमेचा विरहात रात्र सारी जागून काढली तू म्हणतात लोक सारे हे प्रेम जीवघेणे का ही नशा गुलाबी हासून प्राशली तू वाटे कधी तरी की तू जीवनात यावी सांगू कसे कुणाला राहून भाळली तू या रेशमी बटाना तू सावरू नको ना केसात रातराणी जाणून माळली तू देवू कसा कुणाला मी दोष सांग वेडे ही रात्र मोगर्याची जाळून टाकली तू

0 likes 0 shares
WhatsApp