Back to feed
R
Rohan Pawar Love · Marathi · Life

दोरीवरती लेक चालते आई ढोल बडवते एक लेकरु पोटामध्ये एक लेकरु रडते बाप उराशी तप्त निखारा बांधुन लोळत असतो रस्त्यावरची वर्दळ जाते येते थांबत नसते... लेक गोमटी केस पिंजले भुरके तांबुस काही अंगावरती काय घातले तिला माहिती नाही आईसाठी बापासाठी चढते दोरीवरती पोटाच्या पल्याड तिने काहीच पाहिले नाही.. कुणी थांबुनी लेक पाहते कुणी कुणी तर आई शैशव बघते कुणी तिचे तर कुणी तिची तरुणाई भूक एक दोरीवर असते दुसरी भूक सभोती डोळ्यांची तलवार चालते ..अशीच मरते बाई .. ढोल भटकतो हात पसरतो हाती पडते माती कुणी पकडते हात भाबडा चिल्लर देते हाती बाप पाहतो मान वळवतो खोटे खोटे हसतो दिवस चावतो देहाला.... अन रक्त शोषती राती... गर्दी नसली तरी चालतो रस्त्यावरती खेळं हातावरती पोट ठेवले हाच भुकेशी मेळ कुण्या गावचे कुठे जायचे कधीच ठरले नाही शोधण्यात आयुष्य सुखाचे सरून जाते वेळ .... डोंबार्‍याचे जीवन म्हणजे असते त्याची दोरी रोज नवा संसार उभा लोकांच्या दारोदारी वितभर पोट भराया वणवण सदैव आयुष्याची दोरी वरती बळी रोज जातात भाबड्या पोरी...

0 likes 0 shares
WhatsApp