देवा घरी निघुन तु का गं गेलीस आई................ सांग आई तुझे मी गं कसे पांग फेडु, आठवणीने आवरेनासच झालं रडु || देवा घरी निघुन का गं तु गेलीस आई नकळत मला तु सोडुन गेलीसं आई || चुकल असेल माझं तर मला क्षमा करं ऊपकार विसरणार नाही गं आयुष्यभर गेलीस जरी देवा घरी तरी माझ्या ह्रदयी तु आहेस पुजा पाठ करता दिसे मला तु मंदिरी आहेसं || आई-आई म्हणताच अश्रु अनावर आले, ना कुणी अश्रु पुसण्या,ना धिर देण्या आले || आई तुझ्या सारखे दैवत ह्या जगी तरी नाही, आशिर्वाद तुझा सदैव माझ्या पाठीशी राही || तुझ्या सारखे कुणी ह्या विश्वात तरी नाही आई, जगी सर्व सुखी आहे तुझ्या मुळचे गं आई || आठवणीने तुझ्या माझा कंठच दाटुन येतो नकळतच आई तुझा मला असा भास होतो || तुझ्या आठवणीने मी पुरता न्हावुनी जातो कधी भेट देशील आई तुझी वाट मी पहातो || तुझी माया,तुझं प्रेम मज कोण देईल आई जगा मध्ये सर्व श्रेष्ठ मान तुलाचं गं आई || तु केलेल्या संस्काराला जगा मोल नाही तु केलेल्या कष्टाला आज तरी तोड नाही || आई तु मला एकदा तरी आवाज दे गं आई तुझा आवाज माझ्या ह्रदयी मंदिरी घुमु दे || घाल तु साद दे तु हाक मी भेटण्या येईन आई मी भेटण्या येईन आई,मी तुला भेटण्या येईन ||
0 likes
0 shares