देवा सुखी राहुदे पण सुखी असतांना थोडा "आई-बाप" तरी कळुदे........... सुखी ठेवं देवा एवढचं तुझ्या जवळ मागणं | नको कशात विघ्न देवु येवढच माझं सांगणं || नको मला काही देवा तुझा आशिर्वाद हवा | नको काही सोनं नाणं, पाठी तुच ऊभा हवा || श्रीमंत राहु दे रे मनानं जगुदे मजं ताठ मानानं | नको पैशाचा माजं,तिथे मज होऊदे थोडं शहाणं || ईतभर पोटाला मिळुदे रे माझ्या दोन वेळेचा घास | माझ्या कडुन सेवा घडु दे जो पर्यंत आहे माझा श्वास || सुखी ठेव देवा तु माझ्या लाडक्या आई बाबांना | हासत खेळत आयुष्य भरभरुन जगु दे त्यांना || माझ्या पासुन त्यांना दुर करण्या मज नको बुद्धी देऊ | आयुष्यभरं जगु दे त्यांना पण माझ्या पासुन कधीच हिरावुन नको घेवु || सुंदर विश्व दाखवलं त्यांनी, त्यांची सेवा थोडीशी माझ्या हातुन घडु दे | ऊपकार तर कधीच फेडु शकणार नाही,पण निदान प्रयत्न तरी माझ्या हातुन होऊ दे || त्यांच्या जीवावर जगतांना त्यांनी केलेल्या कष्टाचं चिजं माझ्या हातुन घडु दे | आई-बापाच्या मेहनतीला कधी जानलं नाही,थोडा "आई-बाप" तरी कळुदे ||
0 likes
0 shares