दिव्याच्या मंद वातीसारखं जळतांना विझण्याची भिती काळाबरोबर चालता चालता पुसट होत जाते आहे प्रिती आठवणींचे तरंग वर्तुळं प्रश्नांची किनाऱ्यावर गर्दी माझ्या एकटेपणाची काही कोडी आयुष्यातली, मनाच्या गाभाऱ्यात तळ ठोकून आहे जगतांना जाणिवांचा,भावनांचा खेळखंडोबा होत चालला आहे कुठे सुरुवात, कुठे, कधी आणि कस अचानकपणे थांबायचं श्वास आणि जीवनातल अंतर दिशाहीन तरी कापत राहायचं.
0 likes
0 shares