दिवसा गणिक रूप तुझं अधिकाधिक मोहवू लागलंय प्रत्येक प्रतिमेत तुला पाहताना तुझ्यातच अडकू लागलंय तुझ्या प्रत्येक अंदाजाने तुझ्यात विरघळू लागलंय आणि तुझी प्रत्येक तऱ्हा अनुभवायचं ठरवू लागलंय एकदा तू असा एकदा तसा तुझ्यातच गुंतून राहू लागलंय तुझ्या प्रतिमेतच अस्तित्वाचा धुंद परिमल शोधू लागलंय
0 likes
0 shares