Back to feed
S
Saanvi Deshmukh Love · Marathi · Romantic

दिवस सरून गेला , तरी आस तुझी आहे खऱ्याखुऱ्या जगामध्ये , भास तुझा आहे बस साथ हवी तुझी , मग फिकीर ना जगाची जवळ येऊन माझ्या , आस पुरी कर मनाची आस लावून बसलेत डोळे , उगा वाटेकडे तुझ्या खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या गूढ त्या नजरेचं , जणू कोडं होऊन गेलंय लपलेलं ते उत्तर , पार तुझ्यात बुडून गेलंय तू ये जवळ आज , निदान तेच देण्यासाठी माझ्या डोळ्यांमध्ये तुला , साठवून घेण्यासाठी झुरतंय माझं मन , नुसतं आठवणीतच तुझ्या खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या प्रेमाचे ते वारे , पार तुफान होऊन गेलय सरळमार्गी वाटेला , त्याने दिशाहीन केलय भरकटलेला मी , तुझी वाट शोधत आहे देवाकडे रोज , आता तुलाच मागत आहे मग झुरत ठेवून मला , अशी पाहू नकोस मजा खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या भेटीसाठी तुझ्या , ते नभ वेडे झालेत वाट बघता बघता , पार थोडे थोडे झालेत दुखावलेले नभ , माझ्या डोळ्यातून बरसतायत आस ठेवून वेडी , तुझ्या येण्यासाठी तरसतायत ते नभ निर्दोष आहेत , मग त्यांना का देतेस सजा खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या वेळ नसेल तर , वेळ काढून तू ये जगाचे ते भेद , सारे तोडून तू ये कमी असेल मी , तर पूर्ण करण्यासाठी ये नेहमीच जिंकलीस तू , आज हरण्यासाठी ये रोखत असेल पाश , त्याला मोडून तू ये खोटं नाटं जग , आज सोडून तू ये आठवण असेल माझी , निदान ती घेण्यासाठी ये झोप हरवलेल्याला , झोप देण्यासाठी ये तुला भेटण्याचा , आता नाही दुवा दुजा खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या

0 likes 0 shares
WhatsApp