Back to feed
K
Kiara Patel Love · Marathi · Romantic

दिस कसाबसा जातो...रात कशी गं जागवु जीव वेडापिसा होतो..नको माहेराला जाऊ ... पोळी भाजी भात थोडा.. मला डब्यामधे देते धुणीभांडी केर पोछा..बाई करुनिया जाते ऑफ़िसला जाताना मी..गाल कुणाचा गे चावु जीव वेडापिसा होतो..नको माहेराला जाऊ ... कधी मिस कॉल येतो..तुझा मेसेजही येतो त्याचसाठी वेड्यागत..फ़ोन हातामधी घेतो रेंज नाही तुझ्या गावी..वाट किती किती पाहु जीव वेडापिसा होतो..नको माहेराला जाऊ ... समोरची इंदूवैनी ...मला बघते चोरुन भिंत गॅलरीची तिने...काल काढली कोरुन जर आली कधी घरी...कुठे लपु कुठे धावु जीव वेडापिसा होतो..नको माहेराला जाऊ ... तुझ्यासारखाच बांधा..मला वाटेत दिसतो पुढे जाऊन बघतो...आणि नेमका फसतो सांग बायकांच्या शिव्या..रोज रोज कसा खाऊ जीव वेडापिसा होतो..नको माहेराला जाऊ ... दिवेलागणीची वेळ...डोळा फ़ुटतो पाझर तुझी आठवण येते... लागे पुन्हा हुरहुर हात फ़ैलावुन दोन्ही..किती वेळ उभा राहु जीव वेडापिसा होतो..नको माहेराला जाऊ ... आढ्याकडे बघताना..घर खायला उठते छातीवर बसणारी...रात्र वैरीण वाटते तुझ्या मिठीतली ऊब..उशीतून कशी घेऊ जीव वेडापिसा होतो..नको माहेराला जाऊ ..

0 likes 0 shares
WhatsApp