धक्कादायक आणि निषधार्ह : डोळे उघडे ठेवून वाचा काल दुरदर्शनच्या लोकसभा या सरकारी वाहिनीवर लोकमंच या कार्यक्रमात "भारत का संविधान" हा चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता .... या संपुर्ण कार्यक्रमात जवळजवळ संविधानावर टीकाच करण्यात आली होती , या चर्चेत प्रामुख्याने संविधानातील त्रुटी आणि संविधान बदल यावरच चर्चा झाली .... कार्यक्रमाचा Anchor आणि सर्व Panelist तज्ञ हे ठरवुन संविधानाबद्दल नकारात्म चर्चा घडवुन आणत होते . सुत्रसंचालक रामवीर श्रेष्ठ हा तर RSSचा स्वयंसेवकच वाटत होता .... चर्चेत प्रामुख्याने चर्चिले गेलेले विषय खालीलप्रमाणे - * संसद श्रेष्ठ की जनता की संविधान . मग संविधान बदलण्याचा अधिकार जनतेचा की संसदेचा . * आपल्या संविधानात ऐतिहासिक , धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टीना डावलण्यात आले जसे की रामायण , महाभारत , भगवतगीता , वेद , नारदस्मृती , मनुस्मृती या साहित्याचा आणि धर्मग्रंथांचा कोठेही आधार घेतलेला नाही . * ६७ वर्षानंतरही देशातील प्रश्न सोडविण्यात संविधान अपयशी का ठरले ? * राज्यव्यवस्थेचे कार्य फक्त कायदा आणि सुव्यवस्था राखणे इतकेच असते असे चाणक्य म्हणायचा मग आपल्या संविधानाने लोक कल्याणकारी राज्याचा स्विकार केल्याने भारतात नक्षलवाद , दहशतवाद वाढला असे म्हणता येईल असे निष्कर्ष काढुन मोकळे झाले . आता लोक कल्याणकारी राज्यात दलित , आदिवासी , भटके , अल्पसंख्यांक , इतर मागासवर्गीय यांना मिळणार्या सवलती आणि आरक्षण यांनाच विरोध हे स्पष्टपणे चर्चेत प्रामुख्याने जाणवत होते . खरंच हे खुपच भयंकर आहे . SC , ST , OBC , NT या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे , यालाच Slow Poisoning म्हणतात . भाजप आणि RSSने अतिशय लबाडीने आणि धुर्तपणे शासकीय आस्थापनांवर आपल्याच मनुवादी लोकांना बसवलयं . NIFT , इतिहास संशोधन मंडळ , पुरातत्व विभाग , आकाशवाणी , प्रसारभारती , केंद्रिय विद्यापीठे सगळीकडे RSSचेच माणसे हिंदुत्ववादाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि संविधान आणि इतिहासात फेरफार करण्यासाठी बसवलेत . त्यामुळे शहाणे असशाल तर भाजप आणि RSS च्या जाळ्यात अडकुन पडु नका . Surgical Strike आणि नोटाबदलीच्या निर्णय हे फक्त जनतेचा विश्वास जिंकण्यासाठीच केलेले आहेत म्हणजे एकदा जनतेचा विश्वास जिंकला की हे आपला मनमानी आणि बहुजन द्वेशाचा कारभार करायला मोकळे .... - जय भारत .... जय संविधान ....
I
Ishaan Kulkarni
Motivation · Marathi · Motivation
124 likes
67 shares