Back to feed
D
Diya Agarwal Love · Marathi · Romantic

न कळले सरले कधी अन, उरले किती काही प्राजक्त सडाच्या आठवणी कधी शिशीरातील गाणी ..... हृदयातील भावनांचा हा पूर दाटलेला आभार कोणाचे आता हा द्वैत मावळलेला ..... जोडावयास जाता कधी वजावटही घडली परि अंतरी विसावले सारे ऋणानुबंधे प्रीतीची जडली ..... अंगणभर माझ्या ठसे तुमच्या पावलांचे मी रिक्त ना कधीही सुखः तुमचे ओथंबलेले ..... आभाळभर माया तुमच्या प्रेमांकित मी लाभो सदैव आता देवा मागणे हेचि .....

0 likes 0 shares
WhatsApp