Back to feed
A
Avni Mehta Love · Marathi · Romantic

नागपूरच्‍या ANCHOR चे फेसबुकवर प्रेम, केले लग्‍न, आता आहे मृत्‍यूच्‍या दारात नागपूर -  पतीसह सासरच्‍या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्‍या छळाला कंटाळून येथील प्रसिद्ध निवेदक डॉली बेरी (23)  हिने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. डॉक्‍टरांनी तिला  ब्रेन डेड घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.     फेसबुकवर झाले होते प्रेम ... > स्‍वत:ला उद्योजक सांगणाऱ्या नितीन मीरचंदानी याच्‍यासोबत 13 डिसेंबर 2015 रोजी डॉलीचा प्रेमविवाह झाला होता. > या दोघांची फेसबुकवर ओळख झाली होती. फेसबुकवरच ते प्रेमात पडले.  >  दोघांत भेटी - गाठी वाढल्‍या आणि त्‍यांनी लग्‍नाचा निर्णय घेतला.   > लग्‍नाच्‍या 15 दिवसानंतरच  नितीन आणि त्‍याच्‍या आई वडिलांनी माहेरहून 10 लाख रुपये आण म्‍हणून  डॉलीकडे तगादा लावला आणि तिचा  छळ सुरू केला.     नितीनने केली फसवणूक > नितीन हा उद्योजक नसून बेरोजगार आहे, हे लग्‍नानंतर डॉलीला कळाले. > त्‍याचा तिला मोठा मानसिक धक्‍का बसला.    > रात्री बेरात्री तो दारू पिऊन घरी येत असे आणि डॉलीला हुंड्यासाठी मारहाण करत असे.     वाढदिवसाच्‍या दिनीच केला आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न  > सासरच्‍या छळाला कंटाळून डॉली माहेरी गेली.   > 25 जुलैला तिचा वाढदिवस होता. त्‍याच दिवशी तिने बाथरुममध्‍ये गीजरला दोर बांधून गळफास घेण्‍याचा प्रयत्‍न केला.   > तिच्‍या बहिणीने तिला पाहिले. त्‍यानंतर तत्‍काळ रुग्‍णालयात भरती केले.  > मात्र, रुग्‍णालयात नेईपर्यंत ती कोमात गेली होती.    नितीनचे होते तिसरे लग्‍न   > डॉलीशी लग्‍न करण्‍यापूर्वी नितीनचे  दोन महिलांसोबत लग्‍न झालेले होते. त्‍याची काहीही माहिती त्‍याने डॉलीला दिली नाही.  > पूर्वीच्‍या दोन्‍ही बायकांकडून पैसे उकळून त्‍याने त्‍यांना घटस्‍फोट दिला.   > दरम्‍यान, डॉलीसोबत लग्‍न झाल्‍यानंतरही दिल्‍लीच्‍या एका मुलीसोबतही त्‍याचे प्रेम प्रकरण सुरू होते. > या बाबत डॉलीला कळाले होते.     कुटुंबीयांनी केली कारवाईची मागणी   > डॉलीच्‍या कुटुंबीयांनी नितीन आणि त्‍याच्‍या आई- वडिलांविरुद्ध तक्रार दिली आहे.   > पोलिस आरोपींना पाठीशी घालत असून, त्‍यांना अद्याप अटक केलेली नाही, असा आरोप तिच्‍या आईवडिलांनी केला. > त्‍यांच्‍यावर तत्‍काळ कारवाई करावी, अशी मागणीसुद्धा त्‍यांनी केली.

54 likes 61 shares
WhatsApp