Back to feed
I
Ishaan Pawar Love · Marathi · Romantic

नाते तुझे हळुवार जपायचे, आठवण आली की अलगद उमलायचे, नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे, दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे, सांग आठवण आली की काय करायचे? मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे, या वेडयामनाला कोण समजावयाचे? सांग आठवण आली की काय करायचे? तुझ्या जवळ बसलो असता मनं कधी गप्पा मारायचे. मनातले हे बोल सांग कधी कळायचे? सांग आठवण आली की काय करायचे? नाही भेटलो की डोळे अलगद ओले करायचे, सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे, येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे, सांग आठवण आली की काय करायचे? फोन मात्र मीच करायचं, तू कसा आहेस मात्र तू बोलायचे, तु दिसलीस की डोळे भरून पहायचे, ऊघडले डोळे की ते मात्र स्वप्नच ठरायचे, सांग आठवण आली की काय करायचे

0 likes 0 shares
WhatsApp