Back to feed
S
Shaurya Kapoor Love · Marathi · Life

नभ आज भासले शांत वाराही असाच निशब्द. पक्षांच्या विहारही मंद मनास वाटली खंत.. होते असेच पुन्हा पुन्हा जेव्हा तु असतोस उदास असलेले ते आसपास त्यांना तुझ्या दुःखाचा होतो त्रास. तुझ्या हसण्यात भासते संपुर्ण आनंदी जीवन तुझ्या असण्यात भासते तुझ्या सवे सुरेल गान. नको ना होऊ तु उदास आहे ना मी तुझ्या आसपास हवी आहे मज तुझी साथ देशिल ना तु अशीच दाद

0 likes 0 shares
WhatsApp