नमो नमो तुज श्री गणराया नमो नमो तुज श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुण गाया अंगी उठी शेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय घोष बोला मंगलमूर्ती मोरया ||१|| उमा महेश्वराचा असे तू बालक भक्तांचा कैवारी, दृष्टांचा काळ तुमची असू द्या हो आम्हावरी छाया ||२|| प्रती वर्षी घरोघरी पूजन चाले जिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले जय घोष बोला गणपती बाप्पा मोरया ||३|| विठ्ठल नाथाची असे विनवणी कृपा असू द्यावी पूर्ण करितो मी लेखणी बाळ आदिनाथ तव लागे पाया ||४||
125 likes
62 shares