Back to feed
R
Rudra Rao Love · Marathi · Romantic

निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी…. निरोप तुझा घेताना बघते मागे वळूनी डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरुनी … निरोप तुझा मिटते मी पापणी अंधार हि येइ तेव्हा चेहेरा तुझाच होऊनी … निरोप तुझा घेताना पाउस गातो गाणी चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाती…

125 likes 17 shares
WhatsApp