निर्भया वरती अनेक लेख,कविता लिहिल्या गेल्या,वाचलं मन अगदी सुन्न होतं.. " हा मोगरा असा की जो दरवळुन गेला.. माळ्यास ही कळेना का तो झडून गेला उरल्यात पाकळ्या अन् ती वाळलेली पाने.. का कोण काय जाणे आला विरून गेला.. बागेतल्या बहरल्या अन् कुंद जाहलेल्या कोटी फुलाफुलांना तो सावरून गेला... पानास पान थटते वारा पिसाटलेला, भयभीत होई पक्षी आवाज काय झाला.. मन सुन्न सुन्न झाले पाहून भुतली त्या बघ अंत समय आला निर्माल्य तो जहाला....
0 likes
0 shares