Back to feed
K
Kunal Reddy Love · Marathi · Romantic

** नवी जन्मली कहाणी ** तुझी हृदय स्वामिनी मीच तुझी नोकराणी नांदविलीस सख्या रे तुही तुझ्याच तर्हांनी ।।धृ।। पति --परमेश --वर घेतलेस म्हणवुनी पत तुझी पति "देवा" मीही नेली निभवुनी ।।१।। "वर" तुझा मान मोठा मीही राहिले मानुनी मानपान माझा केला दासी पायाची म्हणुनी ।।२।। देश आदेश प्रदेश सारा तुझा स्विकारुनी आज्ञा तुझिच पाळली प्रज्ञा माझी विसरुनी ।।३।। त्यातूनच जन्मा आली भ्रुणहत्येची कहाणी झाली मनुष्य जन्माची सख्या इथूनच हानी ।।४।।

0 likes 0 shares
WhatsApp