नशिबाला कुणाच्या हसू नये नशिब कुणी विकत घेत नाही, वेळेचे नेहमी भान ठेवावे वाईट वेळ सांगून येत नाही ! बुद्धी कितीही तल्लख असली नशिबाशिवाय जिंकता येत नाही, बिरबल बुद्धीवान असला तरीही राजा तो होऊ शकला नाही ! एक दुसर्यासाठी जगणे याचेच नाव जीवन असते, म्हणूनच वेळ त्यांना देणे ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते ! नाती तागडीत तोलू नये पैश्याची ती गुलाम नसतात, नात्यात फायदा बघू नये ती तुम्हाला श्रीमंत करतात ! तुमच्याकडे मारुती असो वा BMW रस्ते त्यांचे एकच असतात, मनगटाला TITAN वा ROLEX असो वेळ एकच दाखवत असतात ! मोबाईल APPLE असो वा SAMSUNG तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात, Economy आणि Business Class प्रवासाला वेळ सारखाच घेतात ! श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात अर्धी श्रीमंती खर्चून जाते, कमाई कमी जास्त असली तरी जेवणात पोळी एकाच आकाराची असते !
0 likes
0 shares