Back to feed
T
Tara Joshi Love · Marathi · Romantic

नेहमीच विचारायची ती मला का प्रेम करतो तू एवढं सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला.. सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला हिप्नोटाइज करतोस तू मला स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला वाटायच सांगाव तिला अग वेडे प्रेम काय सांगून केले जाते बुडायला काय पाणीच लागतं अथांग काय फक्त सागरच असतो अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर चंद्रही भारावतो ह्या लाटाना म्हणूनच त्याही उफाणतात पोर्णिमा आणि अमावस्येला प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो तुझ्या असण्यातच आता माझं असण असते म्हणूच सांगतो माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत.............

0 likes 0 shares
WhatsApp