Back to feed
A
Ayaan Verma Love · Marathi · Romantic

नाहीस तू सोबत तरीही क्षणोक्षणी मी तुलाच स्मरते मंतरलेल्या त्या क्षणांचे स्पर्श आठवणीत जपते वारा तुझाच गंध लेवून देहास माझ्या स्पर्शून जातो गोड शहारा आठवांचा रोमरोमी फूलून येतो बेधुंद ह्या पाऊसधारा आसमंत चिंब होतो भिजवतो मनासही अन् मोरपंखी स्पर्श होतो त्या स्वप्नांना अर्थ देण्या अवचित आता तूच यावे भास हे स्पर्शातले मग सत्यात सारे ते जगावे

0 likes 0 shares
WhatsApp