Back to feed
A
Anika Kapoor Love · Marathi · Romantic

******पाचवीतील मुलाने त्याच्या प्रेयसीसाठी लिहलेले लव्ह लेटर****** प्रिय. SONU . . . . लव्ह लेटर पाठवण्यास कारण की, मला तु खुप आवडतेस.. तु पण माझ्याकडे सारखी बघत असतेस.. म्हणुन मला वाटतंय, मी पण तुला आवडतो.. मी जर तुला आवडत असेन तर, मला गणिताच्या पेपरला मदत कर.. तु डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ, तुझ्या मागं मंदाकिनी बसते ना.. ती तुझ्या रिबीन वर पेनची शाई सोडते, मला तिचा खुप राग येतो.. ती माझ्या घराच्या शेजारीचं राहते, शाईचा बदला घ्यायचा म्हणुन मी तिच्या घराची बेल वाजवुन पळुन जातो.. तु फेअर अँन्ड लव्हली लावत जा, आणखी गोरी होशील.. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि सोनाली दोघीही तुझ्यापेक्षा जास्त गोऱ्या आहेत.. पण त्या मला आवडत नाही.. पत्राचा राग आल्यास मला परत दे.. सरांना देऊ नकोस.......

0 likes 0 shares
WhatsApp