*पोटी एक मुलगी जरूर असावी …* *पोटी एक मुलगी जरूर असावी…* तीच्या जन्मावर आनंदाने बर्फी वाटण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* बेटी धनाची पेटी, असे बाबाला गर्वाने म्हणण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* प्रेमाने पहिला शब्द, बा ss बा म्हणण्यासाठी .. *पोटी एक मुलगी जरूर असावी…* इवल्याश्या पायात पैंजण घालून, छूम छूम घरात धावण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* छानसा फ्रॉक घालून ,परी भासण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* बाबा माझा सुपरमॅन , असं म्हणण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून,बाबाला घास भरवण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* रोज संध्याकाळी, दमलास का रे बाबा आज असं म्हणण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* लगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* रडू नको ना बाबा म्हणण्या साठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* मुलगी असून आईची माया देण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* शाळेत सोडायला तूच ये , असं बाबा जवळ हट्ट धरण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* आई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* उमेदीने तिचा मुद्दा ,बाबाला पटवून देण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* आई चिडल्यावर, बाबाच्या मागे लपण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* बाबाला कन्या दानाचे सुख देण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* सासुराला जातांना, बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* पाडवा सणाला ,बाबाला भारी साडी मागण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* बाबाला बरं नाही, म्हंटल्यावर धावत माहेरा येण्यासाठी … *पोटी एक मुलगी जरूर असावी…* बाबाचे, बाबा म्हणून जगणे सार्थक करण्यासाठी …
0 likes
0 shares