Back to feed
T
Tara Verma Love · Marathi · Romantic

पोटात मूली मारणारे सुशिक्षित लोक जगदंबेची स्थापना करणार.. आई तुझ्या नावाने आज घटस्थापना होणार. काहि लाखासाठी सुनेला जिवंत जाळणारे आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी सुनेला छळणारे. आज स्त्री-शक्तिरूपम् देवीला पूजनार...... आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार.   भर चौकात सोडलेल्या सांडासारखे उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या बाळ-बेटिंची छेड़ काढणारे ९ दिवस चप्पल न घालता आई जगदंबे तुझा उपवास करणार..... आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार. नवरा म्हणुन बायकोला रोज गुलामासारखे वागवणारे रोज सकाळी बायकोसोबत शीलवान बनून मंदिरात जाणार.... आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार. सांग आई असे किती दिवस चालणार खरच अश्या लोकांना तू पावनार की कोपनार मातृत्वाची हेळसांड, स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या पाखंडी भक्तांमुळे  हे खड्गधारी काली...हे करवीर-निवासिनी अंबे..हे जगदंबे.. तुझ्या स्थापनेचे घट कसे ग पवित्र होणार सन्मान करा स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा 💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

238 likes 83 shares
WhatsApp