*पोटात मूली मारणारे "सुशिक्षित लोक"* जगदंबेची स्थापना करणार.. आई तुझ्या नावाने आज घटस्थापना होणार..||1|| *काहि लाखासाठी "सुनेला जिवंत जाळणारे"* आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी "सुनेला" छळणारे. आज स्त्री-शक्तिरूपम् देवीला पूजनार...... आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||2|| भर चौकात "सोडलेल्या सांडासारखे" उभे राहून *जाणाऱ्या येणाऱ्या बाळ-बेटिंची छेड़ काढणारे* ९ दिवस चप्पल न घालता आई जगदंबे तुझा उपवास करणार..... आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||3|| नवरा म्हणुन *बायकोला रोज "गुलामासारखे" वागवणारे* रोज सकाळी बायकोसोबत शीलवान बनून मंदिरात जाणार.... आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||4| सांग आई असे किती दिवस चालणार.. खरच अश्या लोकांना तू पावनार की कोपनार... मातृत्वाची हेळसांड, स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या "पाखंडी भक्तांमुळे" हे खड्गधारी काली...हे करवीर-निवासिनी अंबे..हे जगदंबे.. तुझ्या स्थापनेचे घट कसे ग पवित्र होणार..|| *सन्मान करा स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा*
101 likes
70 shares