पत्नी आणि "बाहेरची ती"..... एकदा एकाला विचारलं की, पत्नी आणि बाहेरची ती यांच्यात फरक काय...... त्यानं फार सुंदर उत्तर दिलं.... म्हणाला, पत्नी ही मधमाशीसारखी असते तर "ती" फुलपाखरासारखी.... नेमके समजलं नाही म्हणून त्याचं स्पष्टीकरण विचारलं, त्यावर तो म्हणाला की, पत्नी हि मधमाशी सारखी असते. कधीकधी ती दंशही करत असेल. त्याचा त्रास होत असेल, तर "बाहेरची ती" ही फुलपाखरासारखीच असल्यामुळे मनाला खुश करते. तिच्या सहवासात छान वाटते.... पण, म्हणून जरा जपून.... कारण, "ते फुलपाखरू" फुलातला रस शोषून निघून जाणार आहे आणि पुन्हा कधीच हाताला लागत नाही. तर, पत्नी मधमाशीसारखीच असल्यानं आपल्या अस्तित्वानं सगळं घर मधासारखं भरून टाकते. सगळ्या कुटुंबात गोडवा निर्माण करते. फुलपाखर येतील आणि जातील पण, मधमाशीला पर्याय नाही. *"Wife is a honeybee"*
0 likes
0 shares