Back to feed
V
Vanya Deshmukh Love · Marathi · Romantic

परके झाले ते क्षण । निसटून गेली ती वेळ.. जी कधी तुझा मिठीत गेली होती हसते आता रात्र मला जी कधी तुझा सहवासाने धुंद झाली होती, का छळतो हा उनाड वारा दिसत नाही का त्याला मी जळताना.. जो चंद्र होता आपल्या प्रेमाचा साक्षी तो ही दिसे आज हळ-हळताना.. कदाचित तू दिलेल्या प्रेमाचा शपथात्याने ही चोरून पहिल्या असतील, वाळूत उमटलेल्या आपल्या पाऊल खुणा अजून ही तशाच राहिल्या असतील.. तुझा तोंडावर वाऱ्याने उडणारे केस कोण आता सरळ करत असेल.. कोण फिरवेल तुझा गालावरून हात अन कोण तुझा साठी झुरत असेल.. हरवली ती संध्याकाळ अन हरवले ते सुंदर नाते.. परके झाले ते सारे क्षण.. जे कधी फक्त माझे होते..

0 likes 0 shares
WhatsApp