Back to feed
K
Kabir Chauhan Love · Marathi · Romantic

प्रीति जीथून येते _ प्रीति जीथून येते हि आंसवे तिथून जळती पतंग वेडे दिपा वरी झडून या अगम्य बंधनात बंदि भले भले फेकून तक्त ताज शिरी बांधती कफन केली अमर प्रीत बांधून ताज त्याने जग जाहले अवाक काळ थांबला दिपून रण रागिणी भडकली गेले मरून योध्दे मिटली तृषा तिची ना पिते रक्त ती अजून वाचा कथा कविता पवीत्र ग्रंथ पोथी दाही दिशेस तिच अधीराज्य गाजवून का चकोर चांदण्यात वेडा पिसा भटकतो ? का सागरास ओढ पुणवेस ये भरून ? मिटताच शिंपले दोन वेगळ्या जीवाचे सांगा कुठून आला मोती तिथे जमून ? तूं आहेस दूर आणि स्मृती दाटल्या अपार सुमन गंध त्याचा मनी कवन ये जडून Happy divali to all my lovely friends

127 likes 5 shares
WhatsApp