प्रीत माझी जीवलगा सख्या प्रीत तराने ऐसे तू छेडीले विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले अस्त रवी झाला,आला नभी शुक्रतारा गंधीत वारा,दरवळे हा ओला किनारा खुलता कळी मनाची हळूच मी लाजले विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले अरुवार स्पर्शाने अधर ही थरथरले येऊनी वसंत जीवनी तनमन मोहरले चाहूल तुझी लागता प्राजक्त मनी बहरले विसरुन भान होऊनी धुंद मी न माझे राहीले मिटता नयन हे स्वप्नी मज तूच दिसे रोमरोमात बनूनी प्रीत सख्या तूच वसे मिठीत येता अबोल श्वास हे गुणगुणले विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले तुझ्याच संगतीने जीवनाचा अर्थ कळे समीप नसता नजर तुला वेड्यापरी शोधे आरंभ अंत सर्वस्व तूची जीवन अलंकारीले विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले फेनील धबधब्यापरी ओसंडूनी वाहले सुटता धीर भावनांचा व्याकूळ मन धावले परीस स्पर्शाने सर्व विश्वची स्वर्णमय झाले विसरुनी भान होऊनी धुंद मी न माझे राहीले
0 likes
0 shares