Back to feed
K
Krishna Nair Love · Marathi · Romantic

प्रेम प्रेम काय असते? कधी होते? कसे होते? काहीच कळत नव्हत जेव्हा तु आयुष्यात आलीस... उडत्या पाखराला सुगंधाने मोहून गेलीस.. कळत नकळत प्रेमच नातं मनाशी जोडून गेलीस.. कधी न पुसतां यावं असं नाव लिहून गेलीस.. वय होत मन जुळायच..लळा लाऊन गेलीस.. ठेच लागतां हृदयी..पाठ फिरवून गेलीस.. प्रेम..मन..आठवणी..भावना.. सारं काही ओरबाडून गेलीस.. तु गेल्याच दुख मोठे नव्हत..कारण... जाता जाता अखेर.. प्रेम काय असत? कस होत?.. ..आणि कस करावं? हे तू शिकवून गेलीस..

0 likes 0 shares
WhatsApp