******प्रेम आंधळे का असते?****** ******मन आणि प्रेम****** मन आणि प्रेम हे दोघे जिवलग मित्र असतात त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते,,एके दिवशी ती दोघे बागेत खेळायला जातात आणि लपाछपी खेळायला सुरुवात करतात लापाछपीच्या त्यांच्या खेळामध्ये राज्य प्रेमावर येते आणि मन लपायला एक काटेरी झुडूप निवडते,, मन एका काटेरी झुडुपामागे लपल्या मुळे प्रेमाला जास्त संशय येत नाही कारण त्याला असे वाटते मन एवढी नाजूक आहे कि ती काटेरी झुडुपामागे लपुच शकत नाही म्हणून प्रेम प्रत्येक काठेरी झुडुपाला काठीने मारत असतो ,, प्रेम मनाला खूप शोधतो आणि शेवटी तो त्या काटेरी झुडुपामागे येतो... पाहतो तर काय त्याची मन विव्हळत होती ,, तिचे डोळे रक्ताने माखलेले होते ,, प्रेम खूप घाबरतो..... खूप आरडा ओरडा करतो,, पण प्रेमाची मदत करायला कोणीच पुढे येत नाही,, शेवटी प्रेम मनाला घेवून डॉक्टर कढे जातो..... डोळ्यात काटे गेल्याने मन आंधळी होते,, मनाचे डोळे जातात ,, म्हणून मग प्रेम मनाला आपले डोळे देते आणि म्हणूनच प्रेम आंधळे असते...
0 likes
0 shares