"प्रेम कळू लागले" "ठरवलं होत प्रेम कधी करायचं नाही.. वेड्या भावविश्वात गुंतून बसायचं नाही.. कोण ती कुठली तीच्या साठी झुरायचं नाही..... तीच्यासाठी आपली स्वप्ने तोडायची नाही.... सगळी स्वप्ने सगळे बोल आज खोटे ठरले.. कसे कोणास ठाऊक प्रेमाच्या बंधनात गुंतत गेलो.... ती माझी अन मी तीचा हे कळू लागले.. माझेच बोल मला नकळत आठवू लागले... मी हि, आज इतरां सारखाच झालो,,, रात्रन- दिवस तीची वाट पाहणे हवेहवेसे झाले... तीचे ते लडिवाळ शब्द ऐकण्यास आज मी चातका प्रमाणे आतुर झालो,, कोणाच्या तरी येण्याने आयुष्य बदलून गेलं... माझं सारं विश्वच तीच्यात दिसू लागलं.. जगून सुद्धा क्षणाक्षणाला कोणासाठी तरी मनातील नाजूक भाव कळू लागले.. खरच मी पण आता कोणावर तरी प्रेम करू लागलो.. कोणाचा तरी सतत विचार करन मलाही आता जमू लागल.. प्रेम काय आसत हे मला कळू लागले……💝💝💝💝💝
0 likes
0 shares