Back to feed
K
Kiara Bagale Love · Marathi · Life

प्रेम नसतं फक्त प्रेम नसतं फक्त दाखवण्यासाठी ते असतं आयुष्यभर जपण्यासाठी प्रेम नसतं मजबुरीन सोडण्यासाठी ते असतं मरूनही जिवंत राहण्यासाठी ! प्रेम नसतं फक्त बघण्यासाठी ते असतं काहीतरी वेगळ करण्यासाठी प्रेम नसतं तू माझा ,मी तुझी म्हणण्यासाठी ते असतं नविन इतिहास घडविण्यासाठी ! प्रेम नसतं तू मला आवडतेस म्हणण्यासाठी ते असतं मनातील भावना मोकळ्यापणान सांगण्यासाठी प्रेम नसतं फक्त हसण्यासाठी ते असतं दु:खात एकमेकांच्या सहभागी होण्यासाठी ! प्रेम नसतं कधी लपवण्यासाठी ते असतं वेळ ,काळाच भान ठेवण्यासाठी प्रेम नसतं फक्त जीवन जगण्यासाठी ते असतं एकमेकांना प्रत्येक वळणावर साथ देण्यासाठी ! प्रेम नसतं फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणण्यासाठी ते असतं म्हणेन ते करण्यासाठी प्रेम नसतं कधी आपला नफा करून घेण्यासाठी ते असतं एकमेकांच सुख साधण्यासाठी ! प्रेम नसतं फक्त एकमेकांना विचारण्यासाठी ते असतं दोघांनीही निभावण्यासाठी प्रेम नसतं कुणाचतरी ऐकून गैरसमजूत करून घेण्यासाठी ते असतं आपल्या विश्वासावर ठाम राहण्यासाठी ! प्रेम नसतं फक्त करण्यासाठी ते असतं एकमेकांची काळजी घेण्यासाठी प्रेम नसतं इतरांना दुखावण्यासाठी ते असतं सदैव एकमेकांना मनात बसवण्यासाठी !

0 likes 0 shares
WhatsApp