प्रेम म्हणून फक्त प्रेम करावं अनं मनावरच आघात व्हावं दोन दिसाचे पुसटसे स्वप्न अनं विरह नशिबी भेट मिळावं सात जन्माची आस बांधूनी क्षणातच स्वप्नभंग व्हावं जाती धर्माची हि बांधिलकी अनं नाजूक मन मोडल्या जावं जगभराचे जपून स्नेहबंध स्वप्नांनाही ग्रहण लागावं मन मारून दोघांनी जगावे अनं एकांती मरण मिळावं यालाच का हो प्रेम म्हणावं कधी न हसता रडतच जावं जगभराचा विचार करावं अनं मी हि प्रेमाला मुकावं
0 likes
0 shares