!!प्रेमांकुर!! करतो मी तुझ्यावर प्रेम खरच करतो अगदी मनापासुन पण नाहि व्यक्त करु शकत मी माझे प्रेम....... तुहि माझ्यावर करतेस प्रेम तुलाहि मी तुझ्यावर प्रेम करतोय हे जाणवलय समजलय तुला मी करतोय ते प्रेम हट्ट का करतेस माझ्या तोंडून ऐकण्यासाठी हो मी करतो तुझ्या वर प्रेम. पण नाहि व्यक्त करु शकत मी माझे प्रेम........ आपण दोघे अनोख्या बंधनांनमध्ये असे अडकलो आहोत कि आपण तेथून एकत्र येऊच शकत नाहि,हे तुला हि माहित आहे आणि मलाहि म्हणून मी नाहि व्यक्त करु शकत माझे प्रेम........ तुझे माझे प्रेम हे अपूर्ण अमर राहिल या जन्मी नाहि तरी पुढच्या जन्मी मात्र नक्कीच प्रेमाचा प्रेमांकुर घेऊनच नव्याने जन्म घेईल.
0 likes
0 shares