Back to feed
S
Sai Verma Love · Marathi · Romantic

प्रेमाचा तो मौसम होतारान गजबजलेले सारे,वारा आला, फांदी तुटलीअवचित विपरीत घडले रे!!!दोन पक्षी भिन्न जातीचेप्रेमात पार बुडाले, वेडे,जिवंत असता या जन्मीकधी न त्यांची भेट घडे!!!एके दिवशी भेट घडतावैरी झाला समाज त्यांचा,करुन वार चोचीचे त्यांनाजीव घेतला त्या दोघांचा!!!कळले प्रेम कुणास न त्यांचेदेवही तेव्हा जागा झाला,बघुन हा प्रकार सारादेवाचाही अश्रू सांडला!!!मरता मरता वचन दिलेत्या दोघांनी एकमेकांना,या जन्मी तर जमले नाहीपुढल्या जन्मी भेटु पुन्हा!!!त्या दोघांचा आत्मा तेव्हाअनंतात त्या विलीन झाला,भेटीसाठी मग वेड्यांनीदेवाचा तो स्वर्ग गाठला!!!देवाचा तो स्वर्ग गाठला!!! :"

0 likes 0 shares
WhatsApp