Back to feed
A
Ayaan Reddy Love · Marathi · Life

प्रेमाच्या सागरामध्ये, मात्र आयुष्याची होडी केली… नकारात्मक वादळ आले… तिला बुडवून घेऊन गेले… आयुष्य माझे तळाला, मी आहे मध्य सागराला… जीवन मार्ग नाही… तर मग आता जगायचे तरी कशाला…? शब्दांचा तो ओंडका, कूठे मध्यांगी सापडला… आयुष्याचा तोच किनारा, जो पुन्हा मला दावला… जगतो आहे आता, हे या शब्दांचे हे ऋण… निरात्म्याचे हे शरिर, तुझ्यावर प्रेम केले म्हणून… आता निश्चय केला, एकांत आयुष्याचा… पुन्हा नाही ओलांडायचा मला, अथांग सागर तो प्रेमाचा…

0 likes 0 shares
WhatsApp