Back to feed
K
Kabir Pawar Love · Marathi · Romantic

प्रिये माझे शब्द तुझ्या अंगाला स्पर्श करतात, धुंद होतात तुझ्यात, छळतात तुला, तुझ्या खळाळणा-या हास्याला, तुझ्या नितळ सौंदर्याला. तरी ही तु गप्प असते. निःशब्द होते, कदाचीत झालं असंच तर..! तुला छळता छळता तुझ्यातल्या तुलाच चोरतील माझे शब्द. तुला विवश करतील माझ्याचसाठी...! पुन्हा म्हणशील तुझ्या शब्दांनी घात केला...! मला ऐकवताना माझ्यासाठी लिहीताना...! म्हणून म्हणतो आत्ताच सावध हो. माझ्या शब्दांना इतकी जागा देऊ नको, तुझ्या मनात हृदयात. लावून टाक आगंच त्यांना..! कधी कधी लिहीताना मला ही ते दगा देतात. नको ते उमटवतात तुझ्याविषयी...! पण तु बिथरू नकोस, माझ्या शब्दांना कळवळताना, फाडून टाक चिरडून टाक त्यांना. जाळूनंच टाक त्यांना...! मी असं वाचलंय. ते मनाला दगा देत नाही कधीच. मनाच्या गाभा-यात असतं तेच उमटवतात...! म्हणून तु आगंच लाव त्यांना...! मन आपोआप जळेल माझं. तुझातल्या तुलाच चोरताना...!

0 likes 0 shares
WhatsApp