Back to feed
K
Kabir Kulkarni Love · Marathi · Romantic

प्रिये...!! माझ्या बाहूत ये ना, मजला मिठीत घे ना..... नको तरसवूस मनाला, अलगद ओठांचा स्पर्श दे ना..... मी तर केव्हाच झालो तुझा, तू ही आता माझी हो ना..... तोड मर्यादेची बेडी पायातली, मनातील आतुर भावना उमलव ना..... ओठावरील हास्याच्या कळीचे, आज फुल बनू दे ना..... नको ना छळूस एवढ, तुजीया प्रेम रंगात मजला रंगव ना.....

0 likes 0 shares
WhatsApp