प्रिय आर्ची... बाळा मी बोलतोय... तुझा तात्या.... माझ्या बाळा, तु जरी चिरडुन गेली आमचं आयुष्य तरी.. प्रिन्सनं तुमच्या सोबत जे केल ते लय वाईट... बाळा, त्याला काय माहीत माझ्या या काळजाच्या तुकड्याला मी किती जपलं होतं... तु तुझ्या आईला म्हनाली होती ना ! डोळ्यात पाणी आणुन ! तात्या बोलतील का....? हो मीच बोलतोय...!! बाळा मला विचारायचंय तुला काय कमी पडलो आम्ही तुला वाढविण्यात...? बाळा जातीपातीच्या चिखलातला मी नाही....! प्रत्येक हौस मौज हात जोडुन उभी होती तुझ्या समोर . आधुनिक जगातल्या आधुनिक जिवन शैलीत तुला वाढविले! तुला बुलेट, ट्रॅक्टर, कार सर्व चालवायला शिकविले! प्रिंन्स व तुझ्यात काही भेदभाव केला नाही... अशा वेळी मी काहीच न कमवणाऱ्या पोरा सोबत लग्न कसं मान्य करु..? कोणता गुण होता परशात म्हणून मी तुझा हात त्याच्या हातात द्यायचा होता..? किशोर वयात मन हळवं व शरीराची भुक तिव्र असते हे मान्य आहे मला..! पण तेवढ्या एकाच कामासाठी जन्म नाही झाला आपला... या वयात उज्वल करियर करायचे सोडून तुम्ही आजकालची पिढी प्रेमातच करियर करत आहात. बाळा तुला जिवापाड जपनारी तुझी आई... तुझ्या केसालाही धक्का लागु नये याची काळजी घेनारा भाऊ... आजी आजोबा मामा मावशी काका काकी आत्या... या सगळ्यांचा एकदाही विचार आला नाही का तुला...? एका मुलासाठी एका झटक्यात आम्हाला लाथाडून गेलीस. अग लहानपणी तुला झोपवण्यासाठी तासनतास खांद्यावर घेऊन फिरायचो तेंव्हा झोपेतही कोनाकडे जात नव्हती मला सोडुन... आम्हा सर्वांपेक्षा काल परवा भेटलेला तो एक पोरगा जास्त महत्वाचा वाटला का तुला..? आर्चे हे आकर्षन फक्त तुलाच वाटत होत असं नाही... ते प्रत्येकालाच असतं या वयात. काही जगावेगळं सैराट करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं... कधी तरी बोलायचं असतं माझ्याशी नायतर आईशी... अगं सैराट व्हायला का हा एवढाच मार्ग नाही. माॅ जिजाऊंनी सैराट होऊन शिवबांना स्वराज्याचा धडा दिला... राणीलक्ष्मी बाई सारखं देशासाठी, मेधा पाटकर समाजासाठी, मदर तेरेसा रंजल्या गांजल्यांसाठी सैराट झाल्या होत्या... तुला माहीत आहे का तु गेल्यानंतर आपल्या तालुक्यात लोकांनी पोरींना शाळा कॉलेजात पाठीवणं जवळपास बंदच केलय, अन् बऱ्याच कवळ्या पोरींचे लग्न उरकीले मायबापांनी. अशा सैराट होण्याच्या भितीनं. तु पळुन गेल्यावर त्या वासनांध लांडग्यांची शिकार होण्यापासून वाचली ! जर ती अनुभवी बाई आली नसती तर तो किशोर वयीन परशा तुला वाचवू शकला नसता बेटा.. मात्र सगळ्याच वाचतात असं नाही... अन मग बाटलेपणाची जाणीव दोघांनाही सतावते.... तु गेल्यापासुन तुझी आई कधीच हसली नाही ... अन् आमदारकीचा उमेदवार मी ... स्वतःला बुडवुन घेतलं दारुत, हे सगळं विसरण्यासाठी... पोरीचे बाप नसलेले काहीजण मला बुरसटलेल्या विचाराचा म्हणतीलही ... पण... बाळ आर्चे व परशा, मला एकच विचारायचंय आम्हा सगळ्यांना उध्वस्त करुन... खरचं तुमच सैराट होणं जरुरी होतं का ...? ? ? तुझा तात्या.... (तरूण मुलांना वाचायला द्या.)
0 likes
0 shares