Back to feed
R
Rohan Singh Love · Marathi · Romantic

प्रियकर:ऐक माझे.... तू आता कुठे बाहेर नको फिरुस ऐक माझे.... कुणाच्या नजरेत सुद्धा नको पडूस... प्रेयसी:का रे? काय नक्की मी केले तरी काय? घाबरवू नकोस असा... काय झालंय ते सांगशील कि नाय??? प्रियकर: काल असाच ब्रम्हदेवाच्या दरबारात बसलो होतो, विशेष काही नाही..... इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो, इतक्यात सगळ्या पऱ्या धावत धावत आल्या, फुलांच्या कळ्या सुद्धा घोळका घेऊन आल्या, "काय झालंय तरी काय?" ब्रह्मदेवसुद्धा घाबरला, "काय मॅटर आहे?" घाबरतच माज्या कानात म्हणाला, "न्याय हवाय आम्हाला न्याय हवाय" त्या सगळ्या घसा फोडून कोकलत होत्या, आरोळ्यांनी अक्का दरबार हलवत होत्या. "सांग सांग देवा.... तू असं का केलं? आमच्यापेक्षा तिला सुंदर का केलं?" देव पडला प्रश्नात "आयला,मी.... काय केलं?" तेव्हा मला आठवलं ते कोणाबद्दल बोलतायत, सगळा राग असा कोणाबद्दल खोलतायत, म्हणून तसाच धावत धावत तुझ्याजवळ आलो, "सांभाळ स्वतःला... दृष्ट आहे जग"... असं तुला म्हणालो. प्रेयसी:"इश्य...चल हट....तुझं आपलं काहीतरीच...वेडा कुठला" ......... " देवाच्या चरणी मागितलेली,एक दुवा माझी असेल, तिथे मागितलेली प्रत्येक, खुशी तुझी असेल, जेव्हापण तुझ्या ❤ ह्रदयाला, प्रेमाची हाक ऐकू येईल ती प्रेमाची प्रत्येक हाक........, माझी असेल.❤

0 likes 0 shares
WhatsApp