Back to feed
D
Diya Mishra Love · Marathi · Romantic

प्रेयसी :- तुला माझी आठवण कधीच नाही आली ? . . प्रियकर :- अ हं कधीच नाही आली .... फक्त तिथे कोणी ओरडलं कि बाबांची आठवण यायची...... बाकी कोणाचीच नाही.. . . खानावळीत जेवताना आईची आठवण यायची..... बाकी कोणाचीच नाही... . . संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो कि मित्रांची आठवण यायची ...... बाकी कोणाचीच नाही...... . . रात्री झोप नसेल येत तर आजीच्या थोपटण्याची आठवण यायची ....... बाकी कोणाचीच नाही . . प्रेयसी :- ( रुसून ) माझी ? ..... माझी आठवण कधीच नाही आली ? . . प्रियकर :- आठवत नाही पण बहुतेक कधीच नाही आली .......... . . (मान खाली घालून नाक मुरडून ती प्रेयसी बसली), . . तेव्हा तो हळूच म्हणाला, " हं पण एक गोष्ट होयची तेव्हा तुझी आठवण फार फारयायची" . . प्रेयसी :- (खूप उत्साहाने) केव्हा ?? केव्हा ?? . . प्रियकर :- जेव्हा जेव्हा मी श्वास घ्यायचो तेव्हा तेव्हा...

0 likes 0 shares
WhatsApp