परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी. घट्ट मिठी, हातात हात, खूप आठवणी.. खूप गप्पा.. मी सहजच विचारलं - "आई कशी आहे रे?" क्षणांत डोळे भरले त्याचे... आणि म्हणाला - "आई माझ्याकडे नसते रे हल्ली.. गेली दोन वर्ष वृद्धाश्रमातच आहे... आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला." त्यानं मला विचारलं - "तुझी आई तुझ्याकडेच असते ना?" मी म्हणालो- "देवाची कृपा आहे. मला आईपेक्षा मोठं नाही केलं त्याने. आई माझ्याकडे नसते... मीच आईकडे राहतोय... ....जन्मापासून"
0 likes
0 shares