Back to feed
V
Vanya Kumar Love · Marathi · Romantic

पसारा ............. दिस कापसावानी कसं उडुनी चाललं तुजा जलम मानसाचा अमरपनाचं सपान पडलं नाही पुरत तुला नदी नाल्याची जिमीन म्हनं मंगळावर आता बंगला बांधीन गर्विष्ठ गुळाच्या ढेपाले चिकटती मुंग्या बहू न उमजत काही संपत जातो हळू हळू झिंग चढली कशाची नाही फिकीर कुनाची जरी हातातल्या रेषाले नाही तू कंदी भीत जग जिंकलं ज्याने त्या सिकंदराकडून काही शिक माया जमवायचा तुला जडला छंद सहा फुटाच्या गड्याची राख होते मडक्यात बंद ज्याचा त्याचा अवतार त्यानं घ्यावा आटोपता ठिवावा आवरून पसारा नाही हुनार मग गडबड वरच्याचा निरोप भेटता

120 likes 72 shares
WhatsApp