Back to feed
V
Vanya Bhat Love · Marathi · Romantic

पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली ! मला आठवेना.. तुला आठवेना.. कशी रात्र गेली कुणाला कळेना. तरीही नभाला पुरेशी न लाली ! गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ? असा राहू दे हात माझा उशाला. मऊमोकळे केस हे सोड गाली ! तुला आण त्या वेचल्या तारकांची, तुला आण त्या जागणार्‍या फुलांची; लपेटून घे तू मला भोवताली

0 likes 0 shares
WhatsApp