A
Anika Iyer
Good_Morning · Marathi · Social_Awareness
पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा.. चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा.. डोंगराआडून दिसू लागली सोनेरी किरणे.. लखलखल्या दाही दिशा सुंदर त्या प्रकाशाने.. जागी झाली दुनिया, बागडू लागले पक्षी.. पर्णपटलांवर उमटली दवबिंदुंची नक्षी.. सडा-सारवणाने अंगणे सारी सजली.. नाजुकशा कळ्यांची फुले बघा झाली.. देवाचिया दारी घंटानाद झाला.. नवी स्वप्ने अन आशा घेऊन दिस नवा उगवला..! शुभ प्रभात - शुभ सकाळ !!
113 likes
38 shares